पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चिंचोली येथे युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्या संकल्पनेतून चिंचोली, धानवड, कंडारी, उमाळा या ठिकाणी अल्पदरात शासकीय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, सहसचिव विराज कावडीया, सरपंच शरद घुगे, केतन पोळ, अतुल घुगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी विजय लाड, किरण घुगे, जितेंद्र पोळ, भागवत पाटील, धानवड रावसाहेब पाटील, संभाजी पवार, सरपंच हरीलाल शिंदे, दिलीप पाटील, ब्रिजलाल पाटील, राजेंद्र मानके, अविनाश पाटील, कौतिक पाटील, उमाळा राजेंद्र पाटील, सरपंच देविदास कोळी, सुरेश धनगर, सरपंच अरुण पाटील, कंडारी मल्हार राव देशमुख, उपसरपंच नंदकुमार देशमुख, भैया सुर्वे, भावडू सुर्वे, छोटू परदेशी आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी परिसरातील समस्त युवासेना, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.