मेळघाटात डॉ. पाटील यांची आरोग्यसेवेसह मदतही…

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी मेळघाटात केवळ आरोग्यसेवाच दिली नाही. तर कर्तव्य बजावत असताना आदिवासी कुपोषित बालकांच्या औषोधोपचारासाठी ३० हजार रूपयांची पदरमोडही केली आहे.

शासनाने मेळघाटातील कुपोषित बालकांची संख्या कमी व्हावी यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. त्यात डॉ. जी. एम. पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आपले कर्तव्य बजावत असतानाच डॉ. पाटील यांनी ३० हजार रूपये किमतीची औषधी उपलब्ध करून देत ती गरजू बालकांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.