Sunday, May 29, 2022

महापालिकेवर भाजपाचा मोर्चा; आयुक्त आले दालनाबाहेर

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

आज भाजपा जळगाव जिल्हा महानगरतर्फे वाढीव घरपट्टीच्या निषेधार्थ भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी केले. मोर्चाची सुरवात भाजपा कार्यालय वसंत स्मृति येथुन घाणेकर, सुभाष चौक, दाणा बाजार, चित्रा, जयप्रकाश नारायण चौक मार्ग, महानगर पालिका येथे समारोप झाला.

- Advertisement -

मोर्चाला जिल्हा महानगर पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, आघाडीचे अध्यक्ष, कार्यकर्ते, व्यापार, उद्योगजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चामध्ये मनपा प्रशासन व सत्ताधारी पक्षाचा निषेध व धिकार करण्यात आला व प्रचंड घोषणा देण्यात आल्या.

जळगाव शहर महानगरपालिकेने संपूर्ण शहरात घरपट्टी फेर मुल्यांकनाचे (रिविजन) कार्य सुरु केले आहे. परंतु फेर मुल्यांकन (रिविजन) चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे यापूर्वी दि.30/11/2021 रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.

सदरच्या निवेदनामध्ये प्रशासनाने मालमत्ता करात केलेली वाढ रद्द करण्यात यावे, यासंदर्भात मागणी केलेली असताना सुद्धा तसेच प्रशासनाने बजावलेल्या नोटीसांना जळगाव शहरातील नागरिकांनी सुद्धा प्रशासनाकडे लेखी स्वरूपात आपल्या हरकती व तक्रारी दिलेल्या असतानासुद्धा प्रशासनाने भाजपाच्या निवेदनाची किंवा नागरिकांच्या लेखी तक्रारीची दखल न घेता सर्रासपणे मालमत्ता करात वाढ केलेली आहे. व वाढीव घरपट्टीची बिले सुद्धा नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहे.

निवेदन देताना प्रशासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले होते की, कुणाला चुकीची घरपट्टी लावण्यात आलेली असेल तर त्या रद्द करण्यात येतील परंतु प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाने कुठलीही दखल न घेता नागरिकांवर जिझिया कर लादण्याचे काम केलेले आहे. याआधीच मनपा प्रशासनाकडून जळगाव शहरातील नागरिकांना प्राथमिक सुख-सुविधा पुरवल्या जात नसताना आपण ही कर वाढ करणे योग्य होणार नाही.

सद्यस्थितीत जळगाव शहरात गटारी स्वच्छता नाही, रस्ते सुव्यवस्थित नाही, पाण्याची सुविधा नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असताना अशा प्रकारे वाढीव व अवाजवी घरपट्टी आकारणी करून त्यानुसार वाढीव अवाजवी बिले वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनआक्रोश आहे.

आम्ही प्रशासनाला जागृत करीत आहोत की, नागरिकांनी घेतलेल्या हरकती व भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची आजही दखल न घेतल्यास आज फक्त जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानंतर मोठ्या संख्येने तीव्र प्रमाणात उपोषण करण्यात येईल. याची दखल घ्यावी असे जळगाव जिल्हा अध्यक्ष व आ. सुरेश भोळे यांनी जन आक्रोश मोर्चा च्या समारोप प्रसंगी सांगितले.

या मोर्चाला खा. उन्मेश दादा पाटील, प्रदेश उपाध्यक्षा मा. आ. स्मिता वाघ, जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जेष्ठ नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे, जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, उद्योग आघाडीचे नितीन इंगळे यांनी संबौधित केले.

नंतर मनपा आयुक्त यांनी कार्यकर्त्यांचा जन आक्रोश पाहुन १७ मजली च्या तळ मजल्यावर बसलेल्या पदाधिकारी चर्चा केली व निवेदन स्विकारले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या