जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन; जळगावात भाजपचा जोरदार जल्लोष

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 23 मार्च 2022 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) जारी करण्यात आले आहे.

सभा व मिरवणूक घेण्यास बंदी

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न समारंभ व प्रेत यात्रा यांना लागू राहणार नाही, असे राहुल पाटील अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले होते.

तरी देखील हे नियम धूडकवत काल गुरुवार रोजी पाच राज्यात झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्याने चार राज्यात भाजपने यश प्राप्त केले. या विजयाचा आनंदोत्सव जळगाव भाजपतर्फे जोरदार साजरा करण्यात आला.

जळगाव शहरातील वसंतस्मृती कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांसह इतरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, ढोल ताश्यांच्या गजरात नाचत गुलाल उधळली. एकमेकांना पेढे भरवत जोरदार विजयाचा जल्लोष साजरा केला. मात्र जल्लोष साजरा करताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे पकडून गर्दी गोळा करत भर रस्त्यावर नाचत जल्लोष करत जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले.

तसेच हा जल्लोष रस्त्याच्या सुरू असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जेसीबी मध्य रस्त्यावर उभी करून जेसीबीवर उभे राहून जल्लोश साजरा केला. रस्त्यावर ट्राफिक जॅम होत मोठ्या प्रमाणत गर्दी झाली. या ट्राफिकमध्ये पोलीस देखील अडकले होते, मात्र त्यांनी देखील बघ्याची भूमिका घेतली होती. भाजप कार्यकर्त्यांच्या या हुल्लडबाजीचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला आहे. जमाबंदीचे मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झाल्याने यावर प्रशासन काय कारवाई करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.