कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील खोटेनगर स्टॉपजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरातील आरएल कॉलनी येथे अनिल युवराज पाटील (वय ४६) हे वास्तव्यास आहेत. ११ फेब्रुवारी रोजी अनिल पाटील हे त्यांच्या दुचाकीने खोटेनगर स्टाफ परिसरातून जात होते. यादरम्यान (एमएच ३० एएफ ५५०४) या क्रमांकाच्या कासदे अनिल पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अनिल पाटील यांना दुखापत झाली असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे.

अनिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवार १३ फेब्रुवारी रोजी कारचालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक दिनेश पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.