पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी ACBच्या जाळ्यात…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील महिला तलाठी वर्षा काकुस्ते या पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे ACB च्या जाळ्यात अडकल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवरे दिगर येथील विट भट्टी चालक यांनी मागच्या वर्षी आपल्या व्यवसायासाठी गौनखणीजाचा परवाना मिळावा म्हणून येथील तलाठी वर्षा काकुस्ते यांच्याकडे पंचवीस हजार रुपये रोख रक्कम जमा केलीहोती. मात्र सदर व्यक्तीला परवाना न देता पुन्हा पंचवीस हजार रुपयांची मागणी यावेळी महिला तलाठी यांच्याकडून करण्यात आली होती. याबाबत सदर व्यक्तीने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपली तक्रार दाखल केली. यासंदर्भात केलेल्या चौकशीत महिला तलाठी वर्षा काकुस्ते यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात पारोळा पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ची कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रूपाली खांडवी, प्रशांत बागुल, संतोष पावरा,राजन कदम, मुकेश आहिरे, सुधीर मोरे, रामदास बारेला, प्रविण मोरे, यांच्यासह इतर कर्मचार्यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.