Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»शाहिद जवान वैभव वाघ यांच्या कुटुंबियांचे मंत्री अनिल पाटलांनी केले सांत्वन…
    जळगाव जिल्हा

    शाहिद जवान वैभव वाघ यांच्या कुटुंबियांचे मंत्री अनिल पाटलांनी केले सांत्वन…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 24, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पांढरद येथील रहिवासी असलेले  एसडीआरएफचे जवान वैभव सुनिल वाघ हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदी पात्रात बचाव कार्य सुरू असताना शाहिद झाले होते. त्यामुळे राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्या गावी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

    यावेळी त्यांनी प्रशासनास त्यांच्या कुटुंबियांना येणाऱ्या काळात योग्य ती मदत करण्याच्या सूचना करत सरकार या घटनेतील इतर शाहिद जवानांसह या कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला होता. या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. सकाळी त्यांनी मुलांचा शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला. यात जळगाव जिल्ह्यातील जवान वैभव सुनिल वाघ यांचाही समावेश आहे.

    वाचवण्यासाठी आले अन् त्यांचाच जीव गेल्याने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात आले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने अनिल पाटील यांनीही दुःख व संवेदना व्यक्त केल्या. तसेच जळगाव जिल्ह्यात दाखल होताच आधी भडगाव तालुक्यातील पांढरद गावी पोहोचत शाहिद वैभव वाघ यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. यावेळी प्रशासनातील अधिकारी देखील त्यांच्या सोबत होते.

    यावेळी मंत्री पाटील बोलताना म्हणाले की, एसडीआरएफ जवान हे होम डिपार्टमेंट कडून यात दाखल झाले असतात, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कोणत्याही क्षणी व कोणत्याही ठिकाणी सूचना मिळताच मदतीसाठी धावून जात असतात, दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी फार मोठे योगदान त्यांचे असते, मात्र बचाव कार्यात अश्या दुर्घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात होत असतो. त्यामुळे भविष्यात अश्या दुर्घटना घडल्यास एनडीआरएफ प्रमाणेच एसडीआरएफ देखील निर्णय घेईल आणि सरकार या जवानांच्या पाठीशी उभे राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

    #amalner #bhadgaon Aid and Rehabilitation Minister Anil Patil jalgaon SDRF SDRF Teams Shaheed Jawan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif