जळगावातील रस्ते होतील दिवाळी अगोदर चकाचक !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील रस्त्याच्या कामासाठी सरकारने शंभर कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी ५२ रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आले.

दिवाळीपूर्वी १९२ रस्ते चकाचक होतील. मंत्रायलातून कामांना मंजुरी मिळाली, परुंतु नाशिकच्या सार्वजनिक बांधकामाकडून मंजुरीची प्रतीक्षा होती. आमदार सुरेश भोळे यांनी त्यासंबंधित तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आदेश जर केले. २७ कोटी रूपयांचा निधी दोन टप्प्यात निधी मंजूर करण्यात आला. एकूण २५७ रस्त्यांची कामे होती. त्यापैकी पहिल्या टप्प्या १९२ रस्त्यांची कामे होतील.

नगरोत्थानमधून वेगळी कामे
शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी २०१८ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान योजनेंतर्गंत १०० कोटी रूपये मंजूर केले होते. त्यापैकी ४२ कोटी कामांना सुरुवात झाली होती. त्यापैकी ९ कोटी सरकारने आतापर्यंत दिले आहे. निधीचा पुढील टप्पा वितरीत होत नसल्याने मक्तेदाराकडून काम बंद करण्यात आले होते. महापालिकेचे शहर अभियंता यांनी नगरविकास विभागाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर १३ कोटींचा निधी देण्याचे नगरविकासकडून स्पष्ट करण्यात आल्याने ४२ कोटींमधील थांबलेली कामे सुरु होतील. ही कामे सार्वजनिक बांधकामकडून करण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.