‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरात चोरी, दागिन्यांसह रोकड लंपास

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरात चोरटयांनी हात साफ केला आहे. पुष्कर श्रोत्रीच्या घरातून मोलकरणीने १० लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दषीने आणि १ लाख २० हजारांची रोकड लांबवली आहे. तिने संपूर्ण रक्कम तिच्या पतीकडे दिली होती. पुष्कर श्रोत्रीनं या प्रकरणी या दोघं पती-पत्नी विरोधात अवलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आधी पैसे चोरल्याचं उघड,
दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, विलेपार्ले पूर्व येथे वास्तव्यास असणारा मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीकडे घरातील कामासाठी आणित्याच्या वडिलांच्या देखभालीसाठी तीन मोलकरीण काम करत होत्या त्यापैकी एक उषा गांगुर्डे (वय ४१) या महिलेने सुमारे ५ ते ६ महिने सकाळी ८ ते रात्री ८ अशा वेळेत काम केले आहे. तिने पुष्करच्या घरातून १ लाख ६० हजार रुपयांचे विदेशी चलनातील रुपये चोरले, २२ ऑक्टोबर रोजी पुष्करची पत्नी परांजण हिला उशीवर संशय आला. त्यावेळी श्रोत्री कुटुंबाने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. विचारपूस केली असता तिने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

दुसरी घटना २४ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली, जेव्हा अभिनेत्याची पत्नी प्रांजल श्रोत्रीनं कपाटातून सोन्याचे दागिने काढले आणि त्यावेळी त्यांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. श्रोत्री कुटुंबियांनी सोन्याचे दागिने खरेदी केलेल्या दागिन्यांच्या दुकानात नेले असता ते दागिने बनावट असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तपासादरम्यान उषा गांगुर्डे यांनी खरे दागिने चोरून त्यावेजी सारखेच बनावट दागिने आणल्याचं उघड झाले. त्यामुळे पुष्कर श्रोत्री यांनी २६ ऑक्टोबर रोजी उषा गांगुर्डे आणि त्यांच्या पतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, ३८१, ४०६ आणि ४२० अंतर्गत विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.