भोकर येथे परप्रांतीयाची आत्महत्या

0

जळगाव: घरात सर्वजण झोपलेले असतांना ५३ वर्षीय परप्रांतीयाने घराजवळील शेतात असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील भोकर येथे उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बहादूर रेमसिंग बारेला (५३, मूळ रा. पलासूद,

जि. बडवाणी, मध्यप्रदेश, ह.मु. भोकर, ता. जळगाव)असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील पलासुद येथील रहिवाशी बहादूर रेमसिंग बारेला हे आपल्या पत्नी, मुलगा, मुलीसह वास्तव्याला होते. शेतातील मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता सर्व जण घरात झोपलेले असताना बहादूर बारेला यांनी नजीकच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता त्यांचा मुलगा प्रकाश हा शौचास गेला. त्यावेळी त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्याने आरडाओरड केली व इतरांच्या मदतीने बारेला यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.