दिगपाल लांजेकर दिगदर्शित ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाने रचला इतिहास

न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या टाईम्स स्क्वेअरवर झळकलं चित्रपटाचं पोस्टर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिगपाल लांजेकर दिगदर्शित ‘शिवराज अष्टक’ ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘शिवराज अष्टक’ मधील चित्रपटांना भरघोस प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांपासून त्या पुष्पातील पाचवे पुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ‘सुभेदार’ चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा’ भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी सहाव्या पुष्पाची घोषणा केली. चित्रपटाने प्रदर्शनाआधीच जागतिक स्तरावर एक विक्रम मोडला आहे.

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट पुढील वर्षी सर्वांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची पहिली झलक समोर आली होती. थोड्या दिवसांपूर्वी दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत चित्रपटाचा प्रोमो शेअर केला. आता पर्यंत फक्त चित्रपटाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे, तोच चित्रपटाने जागतिक स्तरावर रिलीज आधीच इतिहास रचला आहे. न्यूयॉर्कयेथील टाईम्स स्क्वेअरवर चित्रपटाचं पोस्टर झळकलं आहे.

‘शिवरायांचा छावा’ ची जगभरातील सिनेप्रेमी प्रतीक्षा करत आहेत. सह्या या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगत आहे. चित्रपटाचं मोशन पोस्टर न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या टाईम्स स्क्वेअरवर झळकलं आहे. असा विक्रम करणारा ‘शिवरायांचा छावा’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. ‘शिवरायांचा छावा’चे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीने आपल्या सोशल मीडियावरुन ही महत्वाची बातमी शेअर केली आहे. त्यांनी माहिती देताना लिहिले की, “आमचा टीझर टाईम्स स्क्वेअरवर झळकला…”

Leave A Reply

Your email address will not be published.