जळगावात पुन्हा गोळीबार, गुटख्याच्या पुडीवरून वाद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चौदा वर्षीय मुलाने त्याच्या ओळखीच्या मुलाकडून गुटख्याची पुडी मागितल्याने हाणामारी झाली असून, एका गटाचा जमाव अंगावर आल्याने भांडणात सहभागी अट्टल गुन्हेगाराने जमावाच्या दिशेने गोळीबार केल्याने सर्वत्र एकाच धावपळ उडाली आहे.

शिवाजीनगर हुडकोत घडलेल्या घटनेची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन पाटील यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयितांना अटक केली आहे.

संपूर्ण प्रकार
शिवाजीनगात हुडकोत १४ वृषीय मुलाने त्याचा समवयस्क ओळखीच्या मुलाकडे गुटख्याची पुडी मागितली. त्याने गुटख्याची पुडी न दिल्याने वाद होऊन दोघांमध्ये शिवीगाळ, हाणामारी, झाली. हाणामारी करते वेळी दीपक सखाराम बागूल तेथे आला. दीपकभाईच्या माणसाला मारतोय, म्हणून त्याने १४ वर्षीय मुलास मारहाण केल्याने तो तेथून पळत सुटला. त्यांच्या गल्लीतील काही तरुण आणि नातेवाइकांसह पुन्हा भांडणाच्या ठिकाणी येत असताना दिसताच दीपक जाधव याने कंबरेतून गावठी पिस्तूल काढून जमावाच्या दिशेने गोळीबार केला.

गुन्हे शाखेत तात्काळ गुन्हा दाखल
गोळीबार होताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन पाटील यांना घटनास्थळावरून फोन आला. त्यांच्या पथकातील विजयसिंग पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, जितू पाटील, विजय पाटील, महेश महाजन यांनी घटनास्थळ गाठले.

Leave A Reply

Your email address will not be published.