अंबरनाथ पर्यटक क्षेत्रावर ‘या’ तारखेपर्यंत बंदी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

पावसाळा म्हंटले म्हणजे पर्यटक निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी जात असतात. पण आता मुंबईत पावसाने थैमान घातले असून, अनेक पर्यटन स्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुकयातील पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. अशी माहिती अंबरनाथच्या नायब तसीलदार दीपक अनोरे यांनी दिली आहे.

अंबरनाथ ३० आगस्टपर्यंत बंद
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर, भोज धरण, बारावी नदी, चिखलोली, अशी जवळपास दहा ते बारा पर्यटन क्षेत्र आहे. विशेषतः पावसाळ्यात मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या भागातून याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक पावसाळी सहली आणि पिकनिकला येत असतात. मात्र इथे आल्यानंतर पाण्याचा अंदाज न येणं, मद्यपान करून पाण्यात उतरणं आणि अशा अनेक गोष्टीमुळे दरवर्षी अनेक पर्यटकांचा जीव जात असतो, तर बऱ्याच जणांचा अपघात होत असतो. सतर्कता म्हणून यांच्याच्या वर्षी अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. 30 ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू राहणार असून यादरम्यान या सर्व पर्यटन क्षेत्रांच्या 3 किलोमीटरच्या परिघात जाण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती अंबरनाथच्या नायब तहसीलदार दीपक अनारे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.