ठरलं तर मग, ‘या’ दिवशी दयाबेन मालिकेत करणार पुन्हा एंट्री !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हि मालिका सर्वांचं मनोरंजन करत आली आहे. त्यामुळे सर्वच वयातील प्रेक्षक या मालिकेच्या प्रेमात आहे. पण आता एक जोरदार चर्चा रंगात आहे. २०१७ मध्ये दिशा वकाणी म्हणजेच दयाबेन (Dayaben) हिने मालिकेतून काढता पाय घेतला व अजून पर्यंत द्याबेन हि मालिकेत परतीचं नाहीये, पण आता द्याबेन पुन्हा मालिकेत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सद्या सोशल मीडियावर मालिकेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जेथलात सुंदरलाल याला दया पुन्हा घरी परत कधी येणार असल्याचे विचारात आहे. त्यावर सुंदरलाल म्हणतो, “यंदाच्या दिवाळीत दिवे माझी बहीणच लावेल”.. त्यावरून असे लक्षात येते की, दिवाळीत किंवा त्याच्या अगोदर दयाबेन आपल्याला मालिकेत पुन्हा मनोरंजन करतांना दिसणार आहे.

दयाबेन बद्दल माहिती मिळताच संपूर्ण गोकुळधाम सोसायटी तर आनंदी आहेच पण, चाहतेसुद्धा दयाबेन यांची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे आता कधी दयाबेन या पात्राची एंट्री होते हे बघणे आतुरतेचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.