उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 3 कोटी च्या कामाचे भूमिपूजन…..!

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिप्राळा येथे विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले महापौर जयश्री महाजन, शिवसेना उ.बा.ठा. सह- संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व शिवसेना उ.ब.ठा चे जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांच्या हस्ते प्रभागमधील कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक १० पिप्राळा येथे, हुडको नवीन ख्वाजा नगर येथे RCC गटार बांधणे, हुडको काब्रस्तान गट नं 112 व 113 मध्ये काँक्रीट पथवे तयार करणे, राजा गुलश कॉलनी RRC गटार बंधने, सेंट्रल बँक कॉलनी व वृंदावन कॉलनी येथे रस्ते डांबरीकरण व खडीकरण करणे, 214 व 216 येथे RCC गटार बंधने तसेच प्रभाग क्र.९ मध्ये शिवराणा नगर दत्त मंदिर येथे पेव्हर ब्लॉकल्स बसवणे, निवृत्ती नगर येथे दत्त मंदिर येथे पेव्हर ब्लॉकल्स बसवणे इ. विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिक यांनी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिले…..!

Leave A Reply

Your email address will not be published.