जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘या’ विषयावर कार्यशाळा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची दूरदृष्टी व त्याचे कृतीत रुपांतर” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापकांना मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सुरवातीला महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला, जागतिक स्तरावरील समस्या सोडवायच्या असतील तर आपण कात टाकली पाहिजे. त्यासाठी हे नवे शैक्षणिक धोरण मदत करेल. यावेळी या धोरणाला अनुसरून त्यांनी सांगितले कि सध्याला किती एक्सिस्टिंग क्रेडिट सिस्टम असून त्यात अजून कुठकुठल्या क्रेडीटसची वाढ आपले महाविध्यालय करीत आहे. तसेच इंजीनियरिंग व बिझनेस मॅनेजमेंट या शाखांमध्ये “मेजर आणि मायनर” या नवीन शैक्षणिक धोरणातील महत्वाच्या बाबीचा समावेश आपण करीत असून एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल.

यासोबतच जनरल ओपन इलेक्टीव्ह विषयामध्ये १४ ते १६ क्रेडीट महाविद्यालय देणार असून यात ओपन, ऑनलाईन, स्वयंम, एनपीटीएल चे कोर्सेस विध्यार्थ्यांना करता येणार आहे. व्होकेशनल आणि स्कीलचे १४ ते १६ क्रेडीट आहेत तर अॅबिलीटी एन्हांसमेंट्समध्ये महाविद्यालयातील अभ्यासक्रमात चार परदेशी भाषांचे पर्याय दिले जाणार आहे. इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये विध्यार्थ्यांना महाराष्ट्रातील किल्ले, भारतातील मुख्य नद्या, अजिंठा, एलोरा यासारख्या विविध लेण्याच्या अभ्यासासाठी २ क्रेडीट दिले जाणार आहे. परीक्षेत केवळ उत्तम गुण मिळवणे यापेक्षा त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय जास्त भर देणार आहे. संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल (Prof. Dr. Priti Agarwal) यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.