तलवार घेऊन दहशद माजविणाऱ्यास अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलोनी या भागात तलवार घेऊन दहशद माजविणाऱ्याला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. ह्या हद्दपार संशयिताला एमआयडीसी पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली. पिन्या ऊर्फ दिनकर रोहिदास चव्हाण, असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. औद्योगीक वसाहतीजवळील सुप्रीम कॉलनीतील पिन्या ऊर्फ दिनकर रोहिदास चव्हाण (वय २२) याला प्रशासनाने शहरासह जिल्‍ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपारीचे आदेश झुगारत पिन्या ऊर्फ दिनकर चव्हाण सुप्रीम कॉलनीत तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.

त्यावरून पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, किरण पाटील, नाना तायडे यांनी दिनकर ऊर्फ पिन्या यास सुप्रीम कॉलनीतील रामदेवबाबा मंदिराजवळ हेरले. त्याच्याजवळ धारदार तलवार आढळून आली. त्याला तलवारसह अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलिसांत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.