बोदवड येथे नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

0

बोदवड , लोकशाही न्यूज नेटवर्क
बोदवड येथे एका ३५ वर्षे वयाच्या युवकाने नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन आत्त्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. निलेश सुभाष माळी (वय ३५) असे मयत युवकाचे नाव आहे ,

मयत निलेश सुभाष माळी याची पत्नीने घरामध्ये मुलबाळ होत नाही. या कारणावरून घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे निलेश माळी यांच्यावर सासर कडील मंडळींनी मृत्यूस कारणीभुत धरून बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर निलेश माळी हे जामिनावर बाहेर होते. पत्नीची आत्महत्या व त्यास कारणीभूत ठरल्याचे ठपका ठेऊन दाखल झालेला गुन्हा, यामुळे निलेश मानसिक नैराश्याने ग्रासला होता, शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौका जवळील रस्तेलगतच्या दिलीप अग्रवाल यांच्या विहिरीत त्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला.या बाबत बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून रवींद्र गुरचळ पुढील तपासकरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.