वाढदिवसाला ‘हनी सिंग’ देणार चाहत्यांना खास भेट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

हनी सिंग (Honey Singh) हे कला विश्वातल आजवरचं मोठा नाव आहे. ज्यापद्धतीने त्याचे प्रोफेशनल लाइफ चर्चेत होते, तस्सेच वयक्तिक आयुष्य सुद्धा तेवढेच चर्चेत राहिले आहे. प्रसिद्ध गायक आणि रॅपर आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी रॅपरने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. हनी सिंगच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री बनवली जात आहे, जी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हनी सिंगच्या आयुष्यावर बनलेल्या डॉक्युमेंट्रीचा टीझर रिलीज झाला आहे, जो पाहून चाहते खूश आहेत.

हनी सिंग आणि नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक जॉइंट पोस्ट शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये हनी सिंग स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे आणि प्रेक्षक त्याला चीयर करत आहेत. मोजेज सिंग यांनी रॅपर हनी सिंगच्या जीवनावरील माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. आणि त्याचे निर्माते ऑस्कर पुरस्कार विजेते गुनीत मोंगा आहेत. या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंगचा प्रवास दाखवण्यात येणार आहे, तो काही वेळातच देशातील सर्वात मोठा रॅपर कसा बनला. यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो अचानक इंडस्ट्रीतून कसा गायब झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.