भडगाव येथे जागतिक ग्राहक दिन साजरा

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव येथे तहसिल कार्यालया कडून आज भडगाव येथे शासकीय विश्रामगृह(सभागृहात)आज जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यांनतर नायब तहसिलदार मोतीराय यांनी ग्राहक दिनानिमित्ताने मार्गदर्शन केले तालुका कुषी अधिकारी बी.बी.गोर्डे या नंतर भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे सुरेश कोळी, सुरेश रोकडे, राजेश पाटील यांनी ग्राहकाचे चे सरक्षंण व अडचणी, हक्क मदत या संदर्भात मत व्यक्त केले. व्यासपीठावर भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे तालुका कुषी अधिकारी बी.बी.गोर्डे, भडगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर महाजन मा.जिल्हा परिषद सदस्य श्रावण लिंडायत,ग्राहक मंच चे पदधिकारी सुरेश कोळी, सुरेश रोकडे, पत्रकार अशोक परदेशी, नरेंद्र पाटील, निलेश महाले, अबरार मिर्झा, भडगाव चे मा.नगरसेवक नथु अहिरे उपस्थित होते. यावेळी रेशनदुकानदार संघटनेचे ता.अध्यक्ष जंयवत पाटील व सचिव लक्ष्मण पाटील यांच्या सह भडगाव तालुक्यातील सर्व रेशनदुकानदार बंधु उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केले व हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी तहसील कार्यालय चे सर्व कर्मचारी व रेशनदुकानदार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.