हमासचा तेल अवीववर हल्ला; रक्तरंजित संघर्ष धोकादायक वळणावर

0

तेल अवीव ;- इस्रायल आणि हमासच्(Israel and Hamas)या दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेला रक्तरंजित संघर्ष आता धोकादायक वळणावर पोहोचला आहे. हमासनेही आक्रमक भूमिका घेत तेल अवीवर मोठा हल्ला केला. रॉकेट्स हल्ल्यामुळे सगळीकडे एकच धावपळ झाली.

आक्रोश आणि स्फोटाच्या आवाजांनी परिसर हादरला. इस्रायलनेही दुसऱया टप्प्यातील हल्ल्याची तयारी पूर्ण केली असून हमासच्या दहशतवाद्यांचे तुकडे तुकडे करू अशा शब्दांत आक्रमक भुमीका घेतली आहे. त्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, इस्रायलने डागलेल्या रॉकेट्समुळे गाझा पट्टीतील शेकडो इमारती जमिनदोस्त झाल्या असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली हजारो पॅलेस्टिनी गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

लेबनॉनमधून हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ले चढवल्याच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमधून हिजबुल्लाहविरोधात आणखी एक आघाडी उघडण्याची तयारी सुरू केली आहे. लेबनॉन सीमेवरील 2 किलोमीटरपर्यंतचा परिसरही रिकामा करण्यात आला असून इस्रायलमधील 28 समुदायांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. इस्रायलने हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनाही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

उत्तर गाझामध्ये हमासच्या दहशतवाद्यांचे जमिनीखाली मोठय़ा प्रमाणावर अड्डे असण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांनी उत्तर गाझा रिकामे करून दक्षिण गाझामध्ये जाण्याचे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी केले. मात्र दक्षिण गाझातूनही इस्रायलवर रॉकेट्स डागण्यात येत असल्याचे सोमवारी दिसले.संयुक्त राष्ट्रांकडे मिस्र, जॉर्डन, वेस्ट बँक आणि इस्रायलमध्ये अन्नधान्य, पाणी, जीवनावश्यक वस्तू, औषधे, इंधन मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे, हे सर्व काही तासांत गाझामध्ये पोहोचवले जाऊ शकते, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.