‘एमपी’ची आयपीएल टीम होणार ; काँग्रेच्या जाहीरनाम्यातील आश्वासन

0

भोपाळ ;– मध्य प्रदेशात काँग्रेस विरोधात भाजप अशी थेट लढत होणार असल्याने चुरस निर्माण झाली आहे. आता काँग्रेसने या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात काँग्रेसने अनेक आश्वासने दिली आहेत. या जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी रोडमॅप तयार केला असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी सांगितले.

या जाहीरनाम्यातील एका आश्वासनाने अनेकांचे लक्ष वेधले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास आयपीएलमध्ये मध्य प्रदेशची टीम असावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मेडल लाओ करोडपती बनो, मेडल लाओ कार का मालिक बनो, अशी स्पर्धा सुरू करणार असल्याचे सांगितले.

आपले राज्य कृषीप्रधान असल्याने शेतकऱ्यांचा विकास करण्याचे आमचे उद्दीष्ट्य आहे. त्यासाठी तांदूळ 2500 रुपये प्रतीक्विंटल, गहू 2600 रुपये प्रतीक्विंटल दराने खरेदी करण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. जल, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, रोजगार आणि खते यांचा अधिकार देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री कन्यादान योजनेतंर्गत 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. आम्ही मेट्रोचेही काम सुरू केले आहे. हे श्रेयाचे काम नसून राज्याच्या विकासाचा आणि सन्मानाचा विषय असल्याचे कमलनाथ म्हणाले. शिवराज हे फक्त आश्वासने देतात तर कमलनाथ दिलेली आश्वासने पूर्ण करतात, हाच आमच्यात महत्त्वाचा फरक असल्याचे ते म्हणाले. तसेच या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.