लोकशाही न्यूज नेटवर्क /मुंबई
शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवाच्या तिसर्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने व्यक्तीचा स्वभाव चांगला होतो आणि त्याच्या आयुष्यात आनंदाची भरभराट होते, असे मानले जाते. दरम्यान, चंद्रघंटा देवीचे महत्व, पूजा विधी आणि मंत्र जाणून घेऊयात.
शास्त्रानुसार चंद्रघंटा देवीचा रंग सोन्यासारखा तेजस्वी आहे. देवी चंद्रघाटा सिंहावर स्वार झाली आहे. तसेच ती सदैव युद्धासाठी तयार असल्याचे दिसते. देवीला १० हात आहेत. देवी एका हाताने भक्तांना आशिर्वाद देत आहेत. तिच्या उर्वरित ९ हातात कमळ, गदा, बाण, धनुष्य, त्रिशूळ, तलवार, चक्र, भाला आणि अग्नी आहे.
पूजा
नवरात्रीच्या तिसर्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून घरातील मंदीर स्वच्छ करावे. तसेच ‘ओम देवी चंद्रघण्टाये नमः’ या मंत्राचा जप करुन चंद्रघंटा देवीची पूजा करावी. यानंतर देवीला फुले, धूप, तांदूळ, कुंकूसह दुधाची मिठाई अर्पण करावी. मग आरती करावी आणि देवीच्या मंत्राचा जप करावा.
मंगळवार रंग आणि तिसरी माळ
मंगळवार लाल रंग असणार आहे. तर निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ फुलांच्या माळ.
चंद्रघंटा देवीची उपासना केल्याने भक्ताचे सर्व दु:ख दूर होतात. तसेच तो निर्भय आणि शूर बनतो. देवीच्या उपासनेने व्यक्तीचा चेहरा आणि डोळ्यांसह संपूर्ण शरीर योग्य पद्धतीने वाढते. यासोबतच भक्तांच्या ज्ञानात भर पडते.
चंद्रघंटा देवीचा मंत्र
“पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:।।”