सांगली:- महाविद्यालयीन जीवनात एकाच मुलीवर २ मित्रांचे प्रेम असल्याच्या अनेक घटना आहेत. परंतु इस्लामपुरात मात्र एकाच मुलावर दोन मुलींचे असलेले प्रेम आणि त्यातून त्या दोन मुलींची झालेली तुंबळ हा गाणामारी असा प्रेमाचा एक वेगळाच त्रिकोण पहायला मिळाला. पोलिसांनी महाविद्यालयात येऊन कारवाई करत मुलींना शांत केले.
शहरातील एका शास्त्र शाखेच्या महाविद्यालयात १२ वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या २ मुलींवर एका प्रेमवीराचे बरेच दिवसांपासून सुतः । जुळले होते. परंतु आपल्याच मैत्रिणीसी हा संवाद साधत असल्याची कुणकुण पहिलीला पगली अन् तिचा फ झाला. या दोघींच्या मैत्रीत अडसर निर्माण झाला. यावेळी तो तरूण मात्र नामानिराळा राहिला आणि या दोघी मैत्रिणी एकमेकींना भिडल्या.अशावेळी महाविद्यालयाच्या दारातच या दोघी मैत्रीणी एकमेकीच्या झिंज्या उपटल्या. नंतर फ्रीस्टाइलमध्ये मारामारी झाली. त्या दोघींतील एकाची बहीणसुध्दा तिच्या साथीला आली आणि हाणामारीला त्रिकोण लागला. नंतर महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांनी या घटनेची माहिती प्राचार्या पर्यंत पोहोचवली आणि त्यांनी निर्भया पथकाला तातडीने पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी हतक्षेप केला.