Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»PVR INOX ची खास ऑफर… 10 चित्रपट पहा फक्त 699 रुपयांमध्ये…
    ताज्या बातम्या

    PVR INOX ची खास ऑफर… 10 चित्रपट पहा फक्त 699 रुपयांमध्ये…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 16, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    PVR INOX या देशातील मल्टिप्लेक्स चेन चालवणाऱ्या कंपनीने चित्रपट प्रेमींसाठी 699 रुपयांची मासिक सदस्यता योजना सादर केली आहे. या योजनेअंतर्गत, सदस्यता घेणारी व्यक्ती पीव्हीआर आयनॉक्सच्या मल्टिप्लेक्समध्ये जाऊन एका महिन्यात 10 चित्रपट पाहू शकते. ही ऑफर अशा लोकांसाठी चांगली असू शकते जे महिन्यातून अनेक वेळा चित्रपट पाहायला जातात.

    सदस्यता योजना आजपासून सुरू झाली

    PVR INOX द्वारे ऑफर केलेल्या या मासिक सदस्यता योजनेला PVR INOX पासपोर्ट असे नाव देण्यात आले आहे. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या प्लानसाठी किमान तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन आवश्यक आहे. याचा अर्थ तुम्हाला एका वेळी किमान 2097 रुपये खर्च करावे लागतील.

    प्रीमियम थिएटरमध्ये जाण्याची संधी मिळेल का?

    PVR आयनॉक्स पासपोर्ट अंतर्गत, चित्रपटगृहांमध्ये सोमवार ते गुरुवार दरम्यानच चित्रपट पाहू शकतो. त्याच वेळी, कंपनीने तिच्या मासिक सदस्यता योजनेतून IMAX, Gold, luxe आणि Director’s Cut सारखी प्रीमियम थिएटर्स वगळली आहेत. म्हणजेच या प्लॅनद्वारे तुम्ही पीव्हीआर आयनॉक्सच्या प्रीमियम थिएटरमध्ये जाऊ शकणार नाही.

    छोट्या चित्रपटांना फायदा होईल

    पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पीव्हीआर आयनॉक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता म्हणाले की, कंपनी ग्राहकांच्या चित्रपट पाहण्याच्या सवयी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्कात राहते. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट अनुभवायला आवडते, अशी भावना ग्राहकांमध्ये आहे.

    ते पुढे म्हणाले की, दर आठवड्याला सुमारे 13 ते 16 चित्रपट प्रदर्शित होतात. हे उत्पादन ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांनाही कमी किमतीत चित्रपट पाहता येणार असून छोट्या चित्रपटांनाही फायदा होणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #cinema PVR INOX
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

    October 12, 2026

    पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…

    October 12, 2026

    दिल्लीतील आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे कडक निर्देश

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif