इर्शाळवाडी दुर्घटनेत तब्बल २० जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरूच

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बुधवारी रात्री इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. आत्तापर्यंत ११९ जणांना वाचविण्यात यश झाले. मात्र आत्तापर्यंत दुर्दैवाने २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिल.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, सतत पडणारा पाऊस आणि चिखल, धुक्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्या ठिकाणी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. त्या ठिकाणी अजून काही लोक अडकल्याची शक्यता आहे. राज्य सरकाराच्या यंत्रणेसोबत स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बचत कार्यात मदत केली. गुरुवारी दिवसभरात एकूण ११९ लोकांना वाचवण्यात यश आलं. नैसर्गिक आपत्ती राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहे. आतापर्यंत याघटनेत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे.

आजही या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून लोकांना धीर देण्याचे काम याठिकाणी सुरु आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. टना घडल्यापासून दोन तासांच्या आत आपली यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली, गिरीश महाजनांचे विशेष काम आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी या ठिकाणी राहून विशेष लक्ष देत आढावा घेतला. या सर्वांमुळे बचाव कार्यामध्ये गती आली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.