अमन मित्तल व डॉ. पंकज आशिया यांची बदली

आयुष प्रसाद जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार : आशिया यांना यवतमाळ जिल्हाधिकारीपदाची धुरा

0
    • जळगाव –

जिल्हाधिकारी अमन मित्तल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया या दोघांची अचानक बदली झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची काल बदली झाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. या बाबतचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. त्यांच्या जागी पुणे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्ह्णून रुजू होणार असल्याचे त्या पत्रात नमूद केले आहे.
राज्य शासनाने काल काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील अमन मित्तल आणि डॉ. पंकज आशिया यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसतानाच त्यांची बदली करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांना जळगाव जिल्ह्यात येऊन अवघं एक वर्ष झाले होते.
राज्यातील शासनाने अनेक आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून यात जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल आणि जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारि अधिकारी डॉ.पंकज आशिया यांचा देखील समावेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अमन मित्तल यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळली होती.
दरम्यान यानंतर त्यांच्या येथील कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाले नसतांनाच काल त्यांची बदली करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच जिल्हाधिकार्‍यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेल्या आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची देखील बदली झाली आहे. त्यांना आता यवतमाळ येथील जिल्हाधिकारीपदाची धुरा मिळाली आहे. याबाबतचे आदेश अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.