तालुका पोलिसांनी घडवून आणली बापाची अन् मुलीची भेट

आई-वडिलांसह विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी मानले पोलिसांचे आभार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव, गेल्या दोन महिन्यांपासून मुलगी हरवल्याची फिर्याद शनिपेठ पोलीस स्थानकाला देऊन थकणार्‍या बापाला अखेर तालुका पोलीस स्थानकाने दिलासा देत रात्रंदिवस मेहनत करून मोबाईल लोकेशन शोधून बापाची आणि मुलीची हृदय पिळवटून टाकणारी भेट घडवून आणण्यात यशस्वी कामगिरी केली आहे.
रोज खेट्या मारूनही बापाच्या माथी निराशाच पडत असल्याची वस्तुस्थिती जळगावातील एका पीडित बापाची झाली होती. यावेळी शनिपेठ पोलिसांना पालकमंत्री यांनी स्वतः फोन करून या प्रकरणात लक्ष घाला असे सांगितल्यावरही शनिपेठ पोलीस लक्ष घालताना दिसत नसल्याने रोज आपली मुलगी सापडली का? अशी विचारणा करूनही शनिपेठ पोलीस केवळ पीडित बापाला उडवाउडवीची उत्तरे देत होते. मात्र, तालुका पोलीस स्थानकाचे डीवायएसपी यांनी पुढाकार घेत आणि बापाची परिस्थिती पाहत मुलीची भेट घडवून आणली. यावेळी बापाच्या चेहर्‍यावर एक आनंदाची लकेर उमटली असून हे बघून समस्त तालुका पोलीस स्थानकाच्या पोलीस अधीक्षकांसह त्यांच्या कर्मचार्‍यांचे मुलीच्या बापाने आभार मानले आहेत.

आई-वडिलांचा आनंद महत्त्वाचा- तपासी अंमलदार, लीलाधर महाजन
मुलगी हरवल्याची फिर्याद आल्यावर प्रथम काम मुलीला शोधणे हेच होते. दरम्यान, बाप आपल्या मुलीसाठी व्याकुळ झाल्याने दिवस रात्र केवळ मुलगी कुठे आहे, याचा शोध घेण्यात आला. तिचे लोकेशन जेव्हा नाशिक असल्याचे कळलेे, तेव्हा आई-वडिलांसह नाशिक गाठून मुलीला शोधून काढले. आई-बापाला आपल्या मुलीला भेट घडवून आणल्याचा एक वेगळा आनंद होता.

या पोलिसांची होती कामगिरी
फिर्याद आल्याबरोबर समस्त पोलिसांचे पथक हे नाशिक येथे रवाना झाले. यावेळी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, डीवायएसपी गावित, डीवायएसपी आप्पासाहेब पवार, तपासी अंमलदार लीलाधर भगवान महाजन, पो.कॉ. जयेंद्र पाटील आदी पथकाने कामगिरी करत मुलीला शोधून काढण्यात यश मिळवले आहे. त्यांचे समस्त शहरवासीयांकडून कौेतुक होताना दिसून येत आहे.

तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाचा केला सत्कार
मुलीला घरी आणल्यानंतर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक व्हावे, म्हणून आ. राजूमामा भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे अध्यक्ष गौरव लवंगले यांच्यासह, रमेश भोळे, आकाश बाविस्कर, रवींद्र कोळी यांनी पोलीस अधीक्षक, तपासी अंमलदार आणि पथकातील समस्त कर्मचार्‍यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.