ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक थेंब’ अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षात कृषि विभाग मार्फत ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी अल्प भूधारक शेतक-यांना ८० टक्के व महाभूधारक शेतकरी बांधवांना ७५ टक्के अनुदान शासनाकडुन जाहिर करण्यात आले आहे. योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे.

त्यासाठी जिल्हायातील सर्व प्रवर्गातील शेतकरी बांधवांनी http://https//mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून अर्ज भरण्याची प्रक्रीया पूर्ण करावी. तरी शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, व अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.