गहू, हरभऱ्याचे अनुदानित बियाणे उपलब्ध

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

रब्बी हंगामात महाबीज कडून शेतकऱ्यांना गहू, हरभऱ्याचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाबीज चे जळगाव जिल्ह्याचे व्यवस्थापक यांनी केले आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि कृषी उन्नती  योजनेंअंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दोन्ही योजनेत शेतकऱ्यांना हरभरा आणि गहू प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळणार आहे. हरभरा आणि गहू बियाणे महाबीज अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध राहणार आहे.

हरभरा बियाण्यावर मिळणार अनुदान

10 वर्षाआतील हरभरा वाणासाठी ( फुले विक्रम, फुले विक्रांत, राजविजय – 202 इतर) प्रति क्विंटल अनुदान 2500/- रुपये राहणार असून, अनुदानित विक्री दर 4500 रुपये आहे (900/- प्रति बॅग)

10 वर्षावरील हरभरा वाणासाठी ( विजय, दिग्विजय, विशाल व इतर) प्रति क्विंटल अनुदान 2500/- रुपये राहणार असून, अनुदानित विक्री दर 5000 रुपये आहे.

10 वर्षावरील हरभरा काबुली वाणासाठी अनुदान 2500/- रुपये राहणार असून अनुदानित विक्री दर 9000/- रुपये आहे.

गहू बियाण्यावर मिळणार इतके अनुदान-  10 वर्षाआतील गहू वाणासाठी प्रति क्विंटल अनुदान 1500/- रुपये राहणार असून, अनुदानित विक्री दर 2500/ रुपये आहे.

10 वर्षावरील गहू वाणासाठी प्रति क्विंटल अनुदान 1500/- रुपये राहणार असून, अनुदानित विक्री दर 2500/ रुपये आहे.

परमिट घ्यावे लागणार

जिल्ह्यात महाबीजच्या सर्वच विक्रेत्यांकडे गहू व हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे  शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडे / अधिकृत विक्रेत्यांकडे 7/12व आधार कार्डची प्रत ( झेरॉक्स) जमा करुन  परमिट घ्यावे व स्थानिक महाबीज विक्रेत्यांकडून अनुदानावर बियाणे प्राप्त करुन घ्यावे. एका शेत कऱ्यास एक एकरचा लाभ देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी महाबीज कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यां. जिल्हा व्यवस्थापक महाबीज जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.