आदिशक्तीचा उदो उदो; “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” संकल्पना सादर

0

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (74th Republic Day) दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत (Delhi) कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले.महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. यावर्षीच्या पथसंचलनात १७ राज्ये आणि दहा विविध केंद्रीय मंत्रालयांनी मिळून २७ चित्ररथ कर्तव्यपथावर सादर केले.

महाराष्ट्राने यापूर्वी ४० वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावेळी “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” ही संकल्पना सादर केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील पुरातन मंदिरे आणि महिलांचे कर्तुत्व या गोष्टीला सर्वांच्या समोर आणता येतील, व त्याचप्रमाणे आपली संस्कृती इतरांना देखील कळावी. अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली होती.

महाराष्ट्र हा संत, देवदेवतांची भूमी आहे. महाराष्ट्रात ज्याप्रकारे अनेक समाजसुधारक होऊन गेली, तशीच महाराष्ट्राला मोठी धार्मिक परंपरा राहिली आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे आहेत. तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठांचे दर्शन आज दिल्लीतील पथसंलनात सर्वांना घेता आले

Leave A Reply

Your email address will not be published.