भातखंडे येथे प्रजासत्ताक  दिन उत्साहात

0

लोकशाही न्युज नेटवर्क
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक गणराज्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ ज्योती पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तसेच ग्रामपंचायतीच्या इमारतीचे ध्वजारोहणाचे कार्य ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चंद्रकांत सोमवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच विश्वनाथ सह दूध उत्पादक सोसायटीचे ध्वजारोहण चेअरमन धुडकू नागो पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पिक संरक्षण सोसायटीचे ध्वजारोहण मच्छिंद्र शामराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ध्वजारोहण चेअरमन प्रभाकर कृष्णराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. शेवटी भातखंडे माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण विद्यालयाचा माजी विद्यार्थी तथा भारतीय सैन्य दलातील जवान दीपक काशिनाथ मिस्तरी यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर विद्यालयातील विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .

यावेळी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी सह विद्यार्थी पालक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक बी एन पाटील यांनी केले तर आभार संदीप पाटील यांनी मानले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.