शेंदुर्णी नगरपंचायतीच्या उपनगराध्यपदी गणेश पाटील यांची निवड

0

लोकशाही न्युज नेटवर्क
येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यपदाची बुधवारी आँनलाईन पद्धतीने पीठासीन अधिकारी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक प्रक्रिया गणेश पाटील यांचाच एकमेव अर्ज असल्यानेबिनविरोध पार पडली .
शेंदुर्णी नगरपंचायतीमध्ये भाजपचे पुर्ण बहुमत असुन राज्याचे युवक कल्याण क्रिडा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीमध्ये प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणुन सौ.विजयाताई खलसे निवडुन आलेल्या आहेत. भाजपचे बहुमत असुन त्यांनी दरवर्षी उपनगराध्यपदी प्रत्येकाला संधी दिली आहे. सभेचे प्रास्ताविक मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले.

उपनगराध्यक्षपदासाठी गणेश पाटील यांचे नाव मावळते उपनगराध्यक्ष निलेश थोरात यांनी सुचवले त्यास माजी उपनगराध्यक्षा व जेष्ठ नगरसेविका सौ.चंदाबाई अग्रवाल यांनी अनुमोदन दिले. उपनगराध्यपदी गणेश पाटील यांची एकमताने निवड जाहीर होताच नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, गटनेत्या सौ.रंजना धुमाळ तसेच भाजपचे जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल, अमृत खलसे,नारायण गुजर,कडोबा नाना सुर्यवंशी,अजय जहागीरदार,राजेंद्र भारुडे, तुकाराम पाटील, राजेंद्र गुजर,सुनील शिनकर तसेच नगरसेवक सतिष बारी,शरद बारी, राहुल धनगर, गणेश जोहरे, श्याम गुजर,अलिम तडवी,नगरसेविका सौ.संगिता बारी, सौ.साधना बारी,सौ.निता गायकवाड, भाजपचे पप्पु गायकवाड, भोला बारी, योगेश बारी तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसचे धीरज जैन, योगेश गुजर,फारुख खाटीक, गजानन धनगर तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचा सत्कार केला.

यावेळी भाजपचे नेते गोविंद अग्रवाल,अमृत खलसे, राजेंद्र भारुडे, तुकाराम पाटील नगरसेवक निलेश थोरात यांनी आपल्या मनोगतात नगरपंचायतीच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेल्या विकास कामासाठी ना.गिरीश भाऊ महाजन यांनी दिलेला निधी, मार्गदर्शन याबद्दल आभार व्यक्त करत नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्या निवडीबद्दल ना.गिरिश महाजन, जामनेर तालुका भाजपाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजपचे जेष्ठ नेते उत्तमराव थोरात तसेच पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.