रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या.. ३६ रेल्वे गाड्या रद्द; पहा यादी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. नाहीतर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल ३६ गाड्या रेल्वे प्रशासनाने २० ते ३० ऑगस्ट दरम्यान रद्द केल्या आहेत. छत्तीसगडमधील दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे झाेनमधील बिलासपूर विभागातील इंगूर स्टेशन ते रायगड झारसीगुडा सेक्शनमध्ये चाैथ्या लाइनचे काम सुरू होत आहे. यामुळे ३६ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यामध्ये हावडा-मुंबई मेल, शालिमार-एलटीटी या गाड्या सलग आठ दिवस रद्द आहेत. यामुळे भुसावळ विभागातून पुणे, मुंबई, अहमदाबादकडे जाणाऱ्यांची गैरसोय होईल.

या रेल्वे गाड्या रद्द 

हावडा मेल, शालिमार-एलटीटी सलग आठ दिवस बंद संत्रागाची-पुणे (२० व २७), पुणे-संत्रागाची (२२ व २९), शालिमार-पाेरबंदर (२६ व २७), पाेरबंदर-शालिमार (२४ व २५), पुरी-जाेधपूर (२४), जाेधपूर-पुरी (२७), शालिमार-ओखा  (२३ व ३०), ओखा -शालिमार (२१ व २८), मालदा टाऊन-सूरत (२० व २७), सूरत-मालदा टाऊन (२२ व २९), हावडा-पुणे- हावडा (दाेन्ही बाजूची २१ व २८), संत्रागाची-पाेरबंदर (२८), पाेरबंदर-संत्रागाची (२६), संत्रागाची-एलटीटी (२६ व २७), एलटीटी-संत्रागाची (२४ व २५), भुवनेश्वर-एलटीटी (२२,२५,२९), एलटीटी-भुवनेश्वर (२४,२७ व ३१), हटिया-एलटीटी (२६,२७), एलटीटी-हटिया (२८ व २९), हावडा-शिर्डी साईनगर (२५), साईनगर शिर्डी-हावडा (२७), हावडा-मुंबई (२६), मुंबई-हावडा (२८), एलटीटी-कामाख्य (२० व २७), कामाख्य-एलटीटी (२३ व ३०), हावडा-मुंबई मेल (२१ ते २८ आठ दिवस), मुंबई-हावडा मेल (दि. २१ ते २८ आठ दिवस), अहमदाबाद-हावडा, हावडा-अहमदाबाद, शालिमार-एलटीटी व एलटीटी-शालीमार या गाड्या (२१ ते २८), हावडा-पुणे (२०,२५,२७), पुणे-हावडा (२२,२७, २९). या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.