उत्कृष्ट गोलंदाजी नंतर भारतीय फलंदाजी ढेपाळली; 6 खेळाडू शून्यावर बाद… 153 वर गाशा गुंडाळला…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याने पहिल्याच दिवशी रोमांचक वळण घेतले आहे. या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा निर्णय चुकीचा ठरविला. मात्र याला प्रत्युत्तर देताना मोठी धावसंख्या उभारून भारतीय फलंदाजीही कोलमडली.

केपटाऊनमध्ये गोलंदाजांनी कहर केला

केपटाऊन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ५५ धावांत गुंडाळले होते. भारतासाठी सिराजने 9 षटकात 15 धावा दिल्या आणि 6 बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी 2-2 विकेट घेतल्या. पण प्रत्युत्तरात टीम इंडियाही फार काही करू शकली नाही आणि 153 धावांवर ऑलआऊट झाली.

खाते न उघडता 6 खेळाडू बाद

टीम इंडियाच्या या डावात 6 फलंदाज खाते न उघडता बाद झाले. एकवेळ भारतीय संघाने 4 विकेट गमावून 153 धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या खात्यात 1 धावही जमा होऊ शकली नाही आणि ती ऑलआऊट झाली. टीम इंडियाने शेवटचे 6 विकेट केवळ 11 चेंडूत गमावले. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्जर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.