पहिल्याच दिवशी टीम इंडिया ड्रायव्हिंग सीटवर ;

अश्विन - जडेजा फिरकी जोडीने रचला इतिहास...

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारताने येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पहिल्या डावात 1 गडी बाद 119 धावा केल्या. भारत आता इंग्लंडपेक्षा १२७ धावांनी मागे आहे आणि नऊ विकेट शिल्लक आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जैस्वाल 76 धावांवर तर शुभमन गिल 14 धावांवर खेळत होता. कर्णधार रोहित शर्मा २४ धावा करून जॅक लीचचा बळी ठरला. तत्पूर्वी, हैदराबादमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांत आटोपला. इंग्लंडने उपाहारानंतर मार्क वुड आणि बेन स्टोक्सच्या विकेट्स गमावल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय जॉनी बेअरस्टोने 37 आणि सलामीवीर बेन डकेटने 35 धावा केल्या. भारताकडून फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी 2-2 विकेट्स त्यांच्या खात्यात जमा केल्या.

 

अश्विन – जडेजा फिरकी जोडीने हैदराबादमध्ये इतिहास रचला

दरम्यान हैदराबाद येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय फिरकी जोडी जडेजा आणि अश्विन चांगल्या फॉर्ममध्ये होती. पहिल्या कसोटीत जडेजा आणि अश्विन यांनी भारतीय गोलंदाजी जोडी म्हणून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. या दोघांच्या नावावर आता एकूण ५०२* विकेट्स आहेत.

भारतीय गोलंदाज जोडीने कसोटीत सर्वाधिक विकेट्स

अश्विन/जडेजा – ५०३ विकेट*

कुंबळे/हरभजन- ५०१

झहीर/हरभजन – ४७४

अश्विन/उमेश – ४३१

कुंबळे/श्रीनाथ-412

 

Leave A Reply

Your email address will not be published.