3.25 कोटींचे बिल थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित असलेल्या स्टेडियममध्ये होणार भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामना…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. आजचा हा सामना त्यांनी जिंकला तर ते मालिकेवर कब्जा करतील. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ज्या स्टेडियममध्ये सामना होणार आहे त्या स्टेडियममध्ये वीज नाही.

या महत्त्वाच्या सामन्याच्या काही तास आधी स्टेडियमच्या काही भागांत वीज गायब झाली असून याचे कारण थकीत वीज बिल आहे. स्टेडियम व्यवस्थापनाने 2009 पासून वीज बिल भरलेले नाही. हे बिल एकूण 3.16 कोटी रुपयांचे आहे. बिले न भरल्याने ५ वर्षांपूर्वी स्टेडियमचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते.

वीजबिलाची थकबाकी भरण्यासाठी अर्धा डझनहून अधिक वेळा नोटिसा बजावण्यात आल्या असून, एकदा स्टेडियम जप्त करण्याचीही तयारी करण्यात आली होती, मात्र जबाबदार अधिकारी एकमेकांवर आरोप करत आपली जबाबदारी झटकताना दिसत आहेत. छत्तीसगड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीवरून तात्पुरते कनेक्शन स्थापित केले गेले, परंतु ते फक्त प्रेक्षकांची गॅलरी आणि बॉक्स कव्हर करते. आज सामन्यादरम्यान फ्लडलाइट्स लावण्यासाठी जनरेटरचा वापर करावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.