धुळे येथे वास्तव्यास असलेल्या वृद्धेची ५ लाखांना फसवणूक

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

विविध योजनांचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र मुदत पूर्ण होऊन देखील पैसे न देता प्रतापपूर येथील वृद्धेची पाच लाखांत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिट्रिस चेकिन कंपनीचालकासह ५ जणांविरद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रतापपूर येथील कस्तुराबाई फकिरा गांगुर्डे (वय ७९) यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. सिट्रिस चेकइन कंपनीचे चालक ओमप्रकाश बसंतीलाल गोयंकर, प्रकाश गणपत उत्तेकर, नटराजन वेंकटरामण, नारायण शिवराम कोटणीस (रा. सिट्रस चेकईन लि. १६.१९, शिल्पीन सेंटर पहिला मजला, ४० जीडी, आंबेडकर मार्ग, वडाळा, मुंबई) व कंपनीचालक देविदास दौलत महाले (रा. दौलत बिल्डिंग, सटाणा रोड, पिंपळनेर) यांनी कस्तुराबाई यांचा विश्वास संपादन करीत व लेखी आश्वासन देऊन विविध योजनांमध्ये आमिष दाखवले व गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

कस्तुराबाई यांनी क्रिस्टल ऑप्शन कोम्बो प्लॅनची मुदत सहा वर्षे अशा प्लॅनअंतर्गत पाच लाख १०० रुपयांची गुंतवणूक केली. मात्र या प्लॅनसाठी निवडलेली मुदत पूर्ण होऊनसुद्धा संबंधितांकडून रक्कम परत करण्यात आली नाही. शिवाय रक्कम देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केली, अशी तक्रार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.