बापरे ! खासदाराकडे 200 कोटींचे घबाड, कपाटं खोकी नोटांनी फुल्ल (व्हिडीओ)

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

राजकारणात खळबळ उडवणारी घटना उघड झाली आहे. काँग्रेसचे झारखंडमधले राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने छापा टाकला. या छाप्यांमधून तब्बल 200 कोटींचे घबाड मिळाले आहे. या नोटांची मोजणी करताना चक्क मशीन मोडले. अजून किती घबाड सापडेल याचा अधिकाऱ्यांना सुद्धा अंदाज नाहीय. मात्र इतकी मोठी मालमत्ता या खासदाराकडे कुठून व कशी आली हेच समजत नाहीय.

आकडा 250 कोटींच्या आसपास

इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी बुधवारी काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या बौद्ध डिस्टिलरी प्रा. लि. कंपनीच्या झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा 3 राज्यांतील 10 ठिकाणांवर हे छापे घातले. तिथून ही रक्कम जप्त केली. तेव्हापासून जप्त रोकड मोजण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 200 कोटींहून अधिकची रक्कम मोजली असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा 250 कोटींच्या आसपास आहे. ओडिशामध्ये सर्वाधिक रोकड सापडली आहे. 6 डिसेंबरपासून सुरू असलेली कारवाई अद्यापही सुरू आहे.

https://x.com/PTI_News/status/1733060420741538092?s=20

यंत्र कमी पडली 

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलांगीर जिल्ह्यातील सुदापाडा येथे छापेमारी केली असता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना 150 हून अधिक खोकी आढळून आली, ज्यात नोटा भरल्या होत्या. त्या मोजण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने मोजणी यंत्र आणली पण ती कमी पडली त्यामुळे नोटा मोजण्याचे काम संथ गतीने सुरू राहिले.

मोदींनी केले ट्विट

दरम्यान याप्रकणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले आहे. आपल्या मूळ धोरणानुसार ज्यांनी जितके खाल्ले, ते सगळे वसूल करू. पै पै चा हिशेब घेऊ, असे आश्वासन दिले. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर नोटांनी भरलेल्या कपाट आणि खोक्यांचा फोटो शेअर करून या काँग्रेस नेत्यांच्या प्रामाणिकपणाच्या नुसत्या गप्पा आणि भाषणे ऐका आणि हे फोटो पाहा, जनतेकडून लुटलेला हा पैसा पाहा… पण जनतेच्या लुटलेल्या पैशाची वसुली करू. पै पै चा हिशेब घेऊ,ही मोदीची गॅरंटी आहे, असे लिहिले आहे. हे ट्विट प्रचंड गाजत आहे.

https://x.com/narendramodi/status/1733040901457322300?s=20

कोण आहेत खा. धीरज साहू?

खासदार धीरज साहू हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. जुलै 2020 मध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभेवर गेले होते. काँग्रेस पक्षाकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. धीरज साहू हे झारखंड राज्यातील आहेत. झारखंडमधील ते काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.