कारखान्यात अग्नी तांडव ! 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पुणे येथे धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यतील  तळवडेतील ज्योतिबानगर परिसरात स्पार्कल कॅण्डल तयार करण्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. यात  सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला. तर नऊ महिला व एक पुरुष कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना पुणे येथील ससून रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली जखमी आणि मृत महिलांना बाहेर काढले. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

https://x.com/ANI/status/1733083513048727901?s=20

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील ज्योतिबा नगरमध्ये वाढदिवसाच्या केकवर लावल्या जाणाऱ्या फायर कॅडल बनवण्याची कंपनी आहे. या  कंपनीत शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, नऊ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन विभागाला माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड अग्निशमन दलाचे पाच ते सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले आहे. कंपनीमध्ये एकूण १४ कामगार काम करत होते.

 

जखमी कामगारांची नावे 

 

उषा पडावी (वय 40 ), कविता राठोड (वय 35), रेणुका तातोड (वय 20 ), कमल चोरे (वय 35 ), शरद सुतार (वय 50 ), प्रियंका यादव (वय 32 ), सुमन राधा (वय 40 ), अपेक्षा तोरणे (वय 18 )

 

Leave A Reply

Your email address will not be published.