ब्रेकिंग ! चोपड्यात दीड लाखांचा गुटखा जप्त; 4 दुकाने सील

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे गुटखा विक्री केली जातेय. याप्रकरणी आता अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम सुरु केली आहे. चोपडा शहरामध्ये अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी (ता. ७) सकाळी अकराला वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १ लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव, धुळे व नाशिक येथील पथकांनी ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील दर्शन पान सेंटर, किशोर चौधरी यांच्याकडे अवैधरित्या गुटखा विक्री करताना १ हजार ९७० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दयानंद अमरलाल सिंधी यांच्या गुरुकृपा प्रोव्हिजन यांच्याकडे ५१ हजार २०७ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धनराज रूपचंद गेही यांच्या महादेव स्वीट यांच्याकडे ५५ हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवल झन्नालाल जैन यांच्या गोदामातून ५८ हजार ४७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चारही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांचे गोदाम व दुकानांना सील करण्यात आले असून  एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

 

यांनी केली कारवाई 

या पथकामध्ये  नाशिक विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे, नाशिक येथील सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे, जळगाव येथील सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे, धुळे येथील अन्न सुरक्षा अधिकारी के. एच. बाविस्कर, जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. पवार, नंदुरबार येथील अन्न सुरक्षा अधिकारी बेबी पवार, नाशिक येथील अन्न सुरक्षा अधिकारी जी. व्ही. कासार, नाशिक येथील अन्न सुरक्षा अधिकारी यू. आर. सूर्यवंशी,वाय. आर. देशमुख यांचा समावेश होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.