माजी नगरसेवक महेश चौधरी यांचे निधन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव महानगरपालिकेतील स्वीकृत माजी नगरसेवक महेश रतन चौधरी यांचे वयाच्या ५० व्या वर्षी हृदयविकाराने शुक्रवारी ८ डिसेंबरला सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले.

महेश चौधरी हे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान त्यांच्या निधनाची वार्ता कळताच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. महेश चौधरी हे तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. तर त्यांचे वडील आर. टी. चौधरी हे देखील माजी नगरसेवक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.