नाशिकमध्ये आयकर विभागाचे धाडसत्र; बिल्डर्स, उद्योजक रडारवर

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज सकाळपासून नाशिकमध्ये आयकर विभागाने धाडसत्र सुरू केलं आहे. बीटी कडलग यांच्या घरी आज सकाळी दहा गाड्यांच्या ताफ्यासह आयकर विभागाचं पथक दाखल झाले. कडलग यांचे अनेक राजकिय नेत्यांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पथकामध्ये नागपूर आयकर विभागाचे 42 अधिकारी आणि 34 कर्मचाऱ्यांचा  समावेश आहे. पथकानं एकाचवेळी शहरात 14 जागी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. बीटी कडलग, हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार-पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन,सोनवणे बिल्डर्स हे आयकर विभागाच्या रडारवर असून त्यांच्या घर आणि कार्यालयाचा आयकर अधिकाऱ्यांनी ताबा घेतला आहे.

अवघ्या दीड महिन्यापूर्वीच यातील तिघांवर, जिएसटी विभागानंही कारवाई केली होती. त्यानंतर आता आयकर विभागाकडून देखील कारवाई सुरू आहे. अनेक राजकीय नेते, विद्यमान आमदार आणि खासदार यांचेही या बड्या रियल इस्टेट टायकुन आणि ठेकेदारांसोबत व्यावसायिक संबंध असून काही सरकारी ठेकेदार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे या कारवाईनं खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.