बापरे: लोकप्रिय भारतीय क्रिकेटरवर विषप्रयोग, पाऊचमधून..

0

आगरतळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटूवर विषप्रयोग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेटपटू मयंक अग्रवाल विमानात आजारी पडल्याने मोठी खळबळ उडाली.  आगरतळा येथे रणजी ट्रॉफी सामना खेळून झाल्यावर कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल आपल्या संघासोबत परत येत होता. मात्र 30 जानेवारीला विमानात चढताच तो आजारी पडला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या तो आयसीयूमध्ये आहे. या घटनेत मोठा खुलासा झाला आहे. पाणी समजून चुकून विषारी द्रव प्यायल्याचे मयंकने सांगितले असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हा द्रवपदार्थ त्याच्या सीटवर ठेवला होता, असेहीही मयंकने सांगितले. या घटनेनंतर मयंकच्या वतीने आगरतळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

https://x.com/PTI_News/status/1752359617211023414?s=20

तोंडात जळजळ

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचा संघ आगरतळा येथे होता, जिथे रणजी ट्रॉफी सामन्यात त्यांचा सामना त्रिपुराच्या टीमशी झाला. हा सामना जिंकल्यानंतर कर्नाटकचा संघ मंगळवारी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने दिल्लीमार्गे सुरतला रवाना झाला, जिथे त्याचा पुढील सामना रेल्वेच्या संघाशी होणा आहे. कर्नाटकचे सर्व खेळाडू विमानात बसले होते मात्र अचानक मयंकची तब्येत बिघडली. मयंक अग्रवालने विमानातील एका पाऊचमधून काहीतरी द्रवपदार्थ प्यायला, मात्र त्यानंतर त्याला तोंडात जळजळ जाणवू लागली. त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला लगेच खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाऊचमधील द्रवपदार्थ.. 

दरम्यान त्रिपुरा पश्चिम एसपी किरण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मयंक विमानात चढला तेव्हा त्याच्या सीटवर एक पाउच ठेवण्यात आला होता. मयंकच्या मॅनेजरचा हवाला देत एसपी किरण कुमार म्हणाले की, कर्नाटकच्या कॅप्टनने, मयकंने त्या पाऊचमधील द्रवपदार्थ पाणी समजून प्यायला. मात्र थोडसं लिक्विड पिताच त्याच्या तोंडात अचानक जळजळ होऊ लागली. तो काहीच बोलू शकत नव्हता. त्याची तब्येत बिघडल्याचे दिसताच, त्याला रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मयंकच्या तोंडाला सूज आली होती आणि फोड आले होते’ असेही त्यांनी नमूद केले.

कसून तपास

हा एखादा कट असल्याचा संशय व्यक्त करत मयंकच्या मॅनेजरने पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या मयंकची प्रकृती धोक्याबाहेर असून तो स्थिर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.याचा कसून तपास करण्यात येईल, असे त्रिपुराच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.