भारताच समर्थन करणाऱ्या ‘प्रॉसिक्यूटर’ जनरलवर चाकूहल्ला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मालदीवमध्ये प्रॉसिक्युटर जनरल हुसेन शमीम यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. भारताचा समर्थन करणाऱ्या एमडीपी या पक्षाने शमीम यांची नियुक्ती केली होती. गेल्या काही दिवसांपासून भारत मालदीव मधील तणाव वाढला आहे. यातच आता चक्क उच्चपदस्थ व्यक्तीवर भर दिवसा चाकू हल्ला झाल्यामुळे देशाचं राजकारण घडवून झाल्याचं आणखीण स्पष्ट दिसत आहे.

हल्ल्याचे कारण सध्या अस्पष्ट
दरम्यान हा हल्ला राजकीय वाजून झाला आहे की, त्यामागे अन्य काही कारण आहे. याबाबत माहिती समोर आलेली नाही. लूटमार करण्याच्या उद्देशाने देखील हा चाकू हल्ला केला. असावा असं म्हटलं जात आहे. मात्र मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुझ्झु यांच्यावर महाभियोग प्रस्ताव लागू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्यानंतर ही घटना झाल्यामुळे यामागे राजकीय उद्देश असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मालदीवचे सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद मुझ्झु हे समर्थक आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने मालदीवच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून भारत विरोधी आणि पंतप्रधान मोदींविषयी मत व्यक्त केली जात आहे. यापूर्वी सत्तेत असणाऱ्या मालदीवियन डेमोक्रॅटिक पक्षाचे मात्र भारताला समर्थन होते. त्यामुळे सध्या विरोधात असलेल्या या पक्षातील नेत्यांकडून मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारताचे माफी मागावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.