सोन्या चांदीचे दर घसरले ; पहा आजचे भाव

0

जळगाव ;- जळगावच्या सुवर्ण बाजारात आज ३१ जानेवारी रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एकीकडे सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ होत असताना आज दुपारी दोन वाजेपर्यंत सोने प्रति दहा ग्रामला ४४० रुपये तर चांदी ३० रुपयांनी उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोने ३० जानेवारी रोजी १० ग्राम ६२ हजार ८५० होते .

कालच्या तुलनेत आज ४४० रुपयांची घट होऊन सोन्याचे भाव ६२ हजार ४१० रुपये नोंदविले गेले . तर चांदी प्रतिकिलो ३० जानेवारी रोजी ७२ हजार ४३० होती. तर आज चांदीमध्ये अवघ्या ३० रुपयांची घट होऊन ७२ हजार ४०० रुपये इतकी नोंदविली गेली . देशाचे बजेट १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असल्याने सोने चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती . मात्र आज ळगावच्या सुवर्णबाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण दिसून आली.

Leave A Reply

Your email address will not be published.