संतापजनक; प्रसादाचं नाव करत २३ वर्षीय तरुणीवर ५ जणांनी केला अत्याचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाप्रसादाच्या बहाण्याने एका 23 वर्षीय तरुणीला तालुक्याच्या ठिकाणी आणले. पण परत नेऊन सोडण्याच्या बहाण्याने तिला शेतातील झोपडीत नेऊन पाच जणांनी अत्याचार केला आहे. रात्रभर हा सामूहिक अत्याचार झाला असून, त्यावर पीडितेने विरोध करतात आरोपींनी तिला जबर मारहाण देखील केली ही खळबळ जनक घटना जिल्ह्यातील मालखेड येथे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून, पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पाच जणांनी केला अत्याचार
याप्रकरणी महेश वाघमारे (वय 25), पिंटू हरले (वय 39), रमेश भलावी (वय 40), इस्माईल खान (वय 65), नितीन ठाकरे (वय 25), अशी या पाच आरोपींची नावे असून, हे सर्व मालखेड येथील रहिवासी आहे. यातील महेश वाघमारे हा पीडितेच्या कुटुंबीयांच्या ओळखीचा आहे. त्यामुळे तो प्रसादाचं नाव करीत मालखेड येथे घेऊन जातो. असे तिच्या आईला सांगून तिला मालखेड येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांनी पीडितेला रात्रभर आपल्या घरी ठेवले. 28 जानेवारीला तो तरुणीला तिच्या मूळ गावी सोडून देण्यासाठी निघाला महेशने तिला दुचाकी वर बसवले मात्र गावी न जाता त्याने गाडी थेट शेताच्या दिशेने वळवली.

पाचही आरोपींना अटक
या संताप जनक घटनेनंतर पिढीत तरुणीने कसेबसे घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आणि त्यांनी लगेच शेंदुर्जनाघाट पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून 29 जानेवारी रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी आरोपीं विरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत आरोपींचा शोध घेतला. काही तासांमध्येच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात होते. या प्रकरणाचा सखोल तपास शेंदूर जनाघाट पोलीस करत आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.