लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक ‘संजय लीला भन्साळी’ यांचा सुपरहिट चित्रपट गंगुबाई काठियावाडीच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला अभिनेता शांतनु माहेश्वरी सध्या चर्चेत आहे. शांतनु महेश्वरी फसवणुकीचा शिकार झाला आहे. शांतनु माहेश्वरीचे बँक अकाउंट हॅक करण्यात आले आहे. नुकताच अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही धक्कादायक माहिती शेअर केली आहे.
शांतनुने फसवणुकीच्या घटनेची संपूर्ण माहिती त्याच्या लाखो चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याशिवाय या प्रकारापासून सर्वांनी सावध राहण्याचे आवाहनही त्याने केले आहे. त्याच्या पोस्टमध्ये शांतूनेने आपल्या नकळत त्याच्या बँक अकाउंटवर कार्ड बनवल्याचा खुलासा केला आहे. हे प्रकरण आणखी गंभीर तेव्हा झाले, जेव्हा नोंदणी केलेला ई-मेल आयडी, फोन नंबर आणि पत्ता देखील त्याच्या नकळत बदलण्यात आला आहे.
शांतनुने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलेले आहे की, “माझ्या ॲक्सिस बँक अकाउंटची फसवणूक झाली. यावर माझा विश्वास बसत नाहीये माझ्या माहितीशिवाय कार्ड बनवलं गेलं आणि मला कोणताही ओटीपी मिळाला नाही”. सोबतच माझा नोंदणीकृत ईमेल आयडी आणि फोन नंबर कोणत्याही पडताळणीशिवाय बदलण्यात आला आहे. पोस्टमध्ये या प्रकारावर तातडीने कारवाई केल्याबद्दल त्याने संबंधित लोकांचे आभारही मान्य आहे. त्यांनी या पोस्टमध्ये ॲक्सिस बँक सायबर पोलीस आणि मुंबई पोलिसांना टाईप करत मदतीचे आवाहन केले आहे.