ब्रेकींग; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. इम्रान खानला ‘अल्कादिर ट्रस्ट प्रकरणात’ अटक (Arrested) करण्यात आली आहे. इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे वकील फैसल चौधरी यांनी माजी पंतप्रधानांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इम्रान खानला अटक झाल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. इस्लामाबाद हायकोर्टाबाहेरुन पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर पीटीआयने (PTI) निषेध व्यक्त केला आहे.

इम्रानखानच्या अटकेनंतर एक निवेदन जरी केले आहे. इस्लामाबादचे महानिरीक्षक मम्हणाले कि, अल्कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक झाली असून सध्या परिथिती सामान्य आहे. IG यांनी सांगितले कि कलाम १४४ लागू करण्यात आले असून कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. PTIच्या अधिकृत ट्विटर अकाउनवरून केलेल्या ट्विटमध्ये उच्च न्यायालयाबाहेर अटकेदरम्यान हाणामारीत इम्रानच्या वकिलांना गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.