IIT BHUच्या पीडितेवर झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकारणी ३ जणांना अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आयआयटी बीएचयूच्या कॅम्पसमध्ये असलेल्या कर्मणवीर बाबा मंदिराजवळ एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराप्रकणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. कुणाल पांडे, बाजरडीही येथील जीवधीपुर येथील रहिवासी आनंद, सक्षम पटेल अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे खळबळ माजली होती. तिन्ही आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. हे तिघेही गेल्या निवडणुकीत भाजप आयटी सेलमध्ये सहभागी होते.

१ नोव्हेंबरला रात्री दीडच्या सुमारास विद्यार्थिनी आयआयटी बीएचयू मधील न्यू गल्स हॉस्टेलमधून फिरायला गेले होती. यावेळी तिला गांधी स्मृती चौकात एक मित्र भेटला. त्यानंतर दोघे कर्मनवीर बाबा मंदिराजवळ पोहोचले. तेव्हा बुलेटस्वार तीन तरुण मागून आले. त्यांनी विद्यार्थिनीच्या मित्राला धमकावले. पळवुन लावले.

त्यानंतर तीन नराधमांनी विद्यार्थिनीचे तोंड दाबले. आणि तिला कोपऱ्यात घेऊन गेले. तिला विवस्त्र करून अत्याचार केला. आरडाओरड केल्यास विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा फोन हिसकावून घेतला.

घटनेच्या दुसऱ्या आरोपी कॅमेऱ्यात दिसले
घटनेच्या दुसऱ्या दिवशी हे तिघेही चेतगंजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्याचे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावेळी त्यांच्यावर संशयित म्हणून आरोप करण्यात आले होते. परंतु कोणतीही पुष्टी झाली नव्हती. दरम्यान पोलिसांनी खातरजमा करून अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.